HW News Marathi
Covid-19

नवाब मालिकांचे पालकमंत्रीपद दुसऱ्या एखादया कार्यक्षम व्यक्तीला द्या ! बच्चू कडूंच्या पक्षाची मागणी

मुंबई । राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाने आता एक आक्रमक मागणी केली आहे. “परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना काढून त्यांच्या जागी एखादा कार्यक्षम पालकमंत्री द्या”, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. “इतर जबाबदाऱ्यांमुळे नवाब मलिक यांना परभणी जिल्ह्याला वेळ देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याला पालकमंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी दुसरा सक्षम पालकमंत्री द्या”, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे.

मलिक हे परभणी जिल्ह्याला वेळ देण्यात कमी पडत आहेत !

शिवलिंग बोधने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हणतात की, “नवाब मलिक हे राज्य सरकारमधील एक मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे परभणी जिल्हा पालकमंत्री पदासह अन्यही अनेक मोठ्या जबाबदार्‍या आहेत. त्यामुळे मलिक हे परभणी जिल्ह्याला वेळ देण्यात कमी पडत आहेत. गेल्या वर्षी आणि यंदाच्या कोरोना संकटातही मलिक यांनी जिल्ह्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. म्हणूनच परभणी जिल्ह्याला नवाब मलिक यांच्याऐवजी दुसरा सक्षम, पूर्णवेळ देणारा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या.” या पत्राची एक प्रत बच्चू कडू यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबईला बसून परभणीचा कारभार बघणे शक्यच नाही !

शिवलिंग बोधने पुढे म्हणतात की, “पालकमंत्री नवाब मलिक जेव्हा जेव्हा परभणीत जिल्ह्यात येतात, तेव्हा तेव्हा अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन, आश्वासन देऊन, निव्वळ घोषणा करून निघून जातात. मलिक यांनी जिल्ह्याला दिलेली आश्वासने प्रत्यक्षात अंमलात आणली नाहीत. जिल्ह्यातील जनता कोरोनामुळे त्रस्त आहे. रेमडेसिव्हीर आणि बेडसचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मुंबईला बसून परभणीचा कारभार बघणे शक्यच नाही. हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे”, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही – WHO

News Desk

नागपूर महापालिका सभेत गदारोळ, वैयक्तिक टीकेमुळे तुकाराम मुंढे सभागृहातून पडले बाहेर

News Desk

“आम्हालाही लोकांची काळजी आहे”, सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकारचे प्रत्युत्तर

News Desk