HW News Marathi
महाराष्ट्र

गोवा मंत्रिमंडळाची पुनरर्चना, ‘त्या’ ४ आमदारांना मंत्रिपदाची शपथ

पणजी | गोवा काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी बुधवारी (१० जुलै) रात्री काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, आज (१३ जुलै) गोव्याच्या मंत्रिमंडळाची पुनरर्चना करण्यात आली आहे. गोव्याच्या या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या १० आमदारांपैकी ४ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्र्यांनी ४ जुन्या मंत्र्यांना वगळून आपल्या मंत्रिमंडळात ४ नव्या मंत्र्यांना स्थान दिले आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह बाबुश मोन्सेरात, मायकल लोबो आणि फिलिप नेरी रॉड्रिग्स या ४ जणांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. चंद्रकांत कवळेकर यांना गोव्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (१२ जुलै) गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर आणि अपक्ष महसूलमंत्री रोहन खंवटे यांना राजीनामा देण्याचे आदेश होते. तर या ४ जुन्या मंत्र्यांऐवजी नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला बाबू कवळेकर, बाबुश मोन्सेरात, मायकल लोबो आणि फिलिप नेरी रॉड्रिग्स यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली ‘ही’ महत्त्वाची बाब !

News Desk

‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रश्मी ठाकरेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यावर केली टीका

News Desk

संभाजीराजे, नाक दाबल्याशिवाय ठाकरे सरकारचं तोंड उघडणार नाही! – चंद्रकांत पाटलांचा सल्ला

News Desk