HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून अजित पवारांना टक्कर द्यावी ,मुख्यमंत्र्यांची इच्छा !

मुंबई | गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पडळकर यांनी आज (३० सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करत स्वगृही परतले. पडळकरांनी २६ सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडीला पक्षाला सोडचिठ्ठी दिली. धनगर समाजाचे नेते म्हणून पडळकरांना ओळखले जाते. मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी प्रवेश केला आहे.

गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी, असे स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे पडळकरांना बारामतीतून उमेदवारी मिळल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्याविरोधात पडळकर उमेदवारी मिळाल्यामुळे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पडळकर यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत भाजपमध्ये मेगाभरती सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे!

News Desk

देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला!

News Desk

नवाब मलिकांच्या घरी पहाटे ED अधिकारी; दाऊद मालमत्तेच्या व्यवहारासंबंधी कार्यलयात चौकशी सुरू

Aprna