HW News Marathi
राजकारण

मनसे विधानसभा निवडणूक लढविणार, पहिली प्रचार सभा ५ ऑक्टोबरला

मुंबई | मनेस विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (३० सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना सांगितले. लवकरच उमेदवराची घोषणार करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले. येत्या ५ ऑक्टोबरला मनसेची पहिली प्रचार सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यादरम्यान मंत्रलयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नरेंद्र पाटील यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ५ ऑक्टेबरला मनसेच्या पहिल्या प्रचार सभेत राज ठाकरे ईडीच्या कारवाई भाष्य करणार असल्याचे त्यांनी स्वत: पत्रकारांना सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून मनसे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होता. विधासभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही मनसेकडून कोणतीही भूमिका येत नसल्यामुळे मनसे निवडणूक लढविण्यावर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आज राज ठाकरेंनी निवडणूक लढणार असल्याचे सांगत सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आप’चे आमदार देवेंद्र सहरावत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले- सुप्रिया सुळे

swarit

धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटेंनी स्थापन केला नवा पक्ष

News Desk