HW News Marathi
महाराष्ट्र

“विद्यार्थ्यांना PPE किट घालावा लागला तरी चालेल पण MPSCची परिक्षा झालीच पाहिजे”, गोपिचंद पडळकर आक्रमक

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांचा या आंदोलनातील सहभाग अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे. गोपीचंद पडळकर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काय करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच आक्रमक झाले आहे. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत आहेत. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

पुण्यात एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील जवळपास लाखभर विद्यार्थी वास्तव्याला आहे. या विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च जवळपास ७००० रुपये इतका आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एमपीएससीची परीक्षा पाचवेळा पुढे ढकलली आहे. आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलल्यास ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असे पडळकर यांनी सांगितले आहे.

‘पीपीई कीट घालून परीक्षा घ्या, पण घ्या’

आतापर्यंत UPSC, बँकिंग आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आरोग्य विभागाची भरती पक्रियाही पार पडली. मग कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकार एमपीएससीची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. सरकारने अधिवेशन सुरु असताना चर्चा करुन हा निर्णय का घेतला नाही? भले विद्यार्थ्यांना पीपीई किट घालायला लागला तरी चालतील पण MPSC ची परीक्षा 14 तारखेला झालीच पाहिजे. महाराष्ट्र सरकारमधील काही मंडळींनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत लवकरच प्रदर्शित होणार…

News Desk

Live Update : १६९ आमदारांसह महाविकासआघाडीकडून बहुमत सिद्ध

News Desk

मला पक्ष सोडायला भाग पाडू नका !

News Desk