मुंबई | १ मेपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ठाकरे सरकार सर्वांना मोफत लस देणार असल्याची माहिती दिली होती. यावरुन आता वाद सुरु झाला आहे. मोफत लसीकरणावरून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता असल्याचं दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्याने हा गोंधळ अधिकच समोर आला आहे. आघाडीतील या गोंधळावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असंही ते म्हणाले आहेत.
#बिघाडी_सरकारचे लाडके मंत्री @AUThackeray यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. #हिंदू_हृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘ वाटाघाटी ʼ आणि ‘टक्केवारीमुळे ʼ लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत #लसीकरणाचा’ . pic.twitter.com/gBLC8F33br
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) April 25, 2021
काय होतं आदित्य ठाकरेंचं ट्विट?
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
नवाब मलिक काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.