HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

मुंबई | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर तिकीट मिळविण्यासाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जोर धरला आहे. निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी पक्षांतर करत आहे. नुकतेच वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आज (३० सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्राकंडून मिळली आहे.

पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदार संघातून तिकीट देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. पडळकर यांच्यासोबत काँग्रेसचे सहा आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, काँग्रेसच्या ६ आमदारांनाचा भाजप प्रवेश लांबणीवर गेला आहे. या सहा आमदारांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ६ आमदारांना काँग्रेस दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळालेली नसल्यामुळे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर गेला असल्याचे कळाले आहे.

या सहा आमदारांमध्ये अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम मेहेत्रे, भारत भालके यांचा समावेश होता. हे सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उदय सामंत प्रयत्नशील

swarit

भाजप शक्तिप्रदर्शन स्वबळावरील सत्तेसाठी

News Desk

आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ५३० बसेसची सेवा  

News Desk