HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटील बुद्धिमान माणूस, लाॅकडाऊनबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सल्ला त्यांना घ्यावा वाटला नसेल !

सांगली | सांगलीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्याचे पालंकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज (२० जुलै) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊनच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पडळकर म्हणाले, “मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो. इथे आल्यावर समजलं की, जिल्ह्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. मला बैठकीला का बोलावले नाही हे माहिती नाही. पण जयंत पाटील हा अत्यंत तज्ज्ञ आणि बुद्धिमान पंडीत माणूस आहे. मला असं वाटतं की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सल्ला घ्यावा, असं त्यांना वाटत नसावं”, असा टोला पडळकरांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.

“जयंत पाटील यांची नेमकी भूमिका काय ते मला नेमकं माहिती नाही. पण कोरोना आढावा बैठकीत चर्चेला बोलावण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेचा आमदार असा भेदभाव करु नये”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

“जयंत पाटील यांना एक लाख लोकांनी मत देऊन निवडून दिलं आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनीच गोपीचंद पडळकर म्हणजेच मला आमदार केलं आहे”, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांची भेट का घेतली? राऊतांनी दिलं उत्तर…

News Desk

या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आहे, राणेंची मुख्यमंत्र्यावर जहरी टीका  

News Desk

ज्या वेगात भाजप सत्तेवर आले त्याच वेगाने पराभूत होईल- अजित पवार

News Desk