HW News Marathi
महाराष्ट्र

अहिल्यादेवींवरती बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते? – गोपीचंद पडळकर

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून पडळकरांनी निशाणा साधला आहे. “ये पब्लिक है सब जानती है!” असं म्हणत एका फेसबुक पोस्टद्वारे पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. “सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वरती बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते?” असा सवाल केला आहे.

“वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी १.५ कोटी विद्यापीठ व १.५ कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठ १ कोटीचा निधी द्यायला तयार होतं, त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली पण हे सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे ‘पई पाव्हण्यांचं सरकार’ याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय.कारण पहिली स्मारक समिती सुडबुद्धीने बरखास्त करून आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहिल? याची सोय लावलीये” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2022 पर्यंत भारताच्या सीमेवरील कुंपणाचे काम पूर्ण होणार; अमित शहांनी दिली माहिती

News Desk

भाजपच्या माधव भंडारी यांची मंत्री पदी वर्णी

swarit

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाची जीत कोणाची हार?

News Desk