HW News Marathi
महाराष्ट्र

ती भेट म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय, पडळकरांचा घणाघात

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कालपासून ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशात आज (२१ जून) दिल्लीत पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. पवार आणि किशोर यांच्या भेटीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाश्य केले आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत दीर्घ बैठक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा दिल्लीत दोघांमध्ये बैठक झाली. त्यावरुन पडळकरांनी टीकास्त्र सोडलं.

समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याची व्यवस्था राज्य सरकार करतंय. ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण नाकारलं गेलं. तारखा पुढे ढकलण्याशिवाय राज्य सरकारने काही केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता, असं पडळकर म्हणाले. भाजपने २६ जूनला चक्का जामची हाक दिली आहे. प्रस्थापितांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवलं. यापुढे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असा आरोपही पडळकरांनी केला.

हे चुलता पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार

हे चुलता पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार आहे. मागासवर्गीय उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे होऊ शकतात? हा मनमानी कारभार चालला आहे. उपसमितीचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं. कोणतीही चर्चा न करता त्यांनी काम केलं, हे काँग्रेसवालेच सांगत आहेत. मराठा समाजाच्याही ताटात माती टाकायचं काम यांनी केलंय. बहुजनांवर अन्यायाचं षडयंत्र या सरकारने रचलंय. काँग्रेस मूग गिळून गप्प बसलंय. त्यांचं काका पुतण्या पुढे काही चालत नाही, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. मग आंबेडकरांना मानणारे काँग्रेसवाले राजीनामा का देत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला. तसंच भाजपच्या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं, सरकारला हादरा दिला पाहिजे, असं पडळकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला कोणताही विषय उठसूट केंद्राकडे नेण्याची सवय आहे. कोरोनाकाळातही यांनी हेच काम केलं, असंही पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?”, नारायण राणेंचा गंभीर सवाल

News Desk

खोटी आकडेवारी देऊन फसवणूक केल्याबद्दल सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावीः सचिन सावंत

News Desk

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरण; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Aprna