HW News Marathi
महाराष्ट्र

तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, गोपीचंद पडळकर थेट सोनिया गांधींकडे करणार तक्रार

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर महाविकासआघाडीमधील मंत्र्यावर सडकून टीका करताना पाहायला मिळतात. आता गोपीचंद पडळकर थेट कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्रव्यवहार लिहित मंत्र्यांची तक्रार करणार आहे. तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यांपुढे माना डोलावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सत्तेचे वेसन बांधल्या गेल्याने हे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करत आहेत. तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.

 

सरकारला अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची घाई

शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं आघाडी सरकार किती बहुजनद्वेष्टं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेत्यांची आजची बैठक रद्द, ‘हे’ आहे कारण 

News Desk

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

swarit

धुळ्याहून निघालेली पपईची गाडी उलटली, अपघातात १५ मजुरांचा झाला मृत्यु

News Desk