HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ आता पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र!

मुंबई। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल(४ सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहिलं होतं, त्यावर विजय वडेट्टीवारांनी पाडळकरांवर टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर देत आता गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांना पत्र लिहिलं आहे. हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या पत्रात पडळकरांनी एकूण सहा वेळा किंबहुना शब्द प्रयोग केला आहे.

किंबहूना,आपण म्हणता ते खरं आहे

गोपीचंद पडळकर यांनी पत्रातून वडेट्टीवारांना टोला लगावला आहे. “मी मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे. किंबहूना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते”, असा टोला पडळकरांनी पत्रातून लगावला आहे.

किंबहुना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते.

किंबहूना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते.

किंबहुना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. किंबहुना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधूल दारूबंदी उठवता आली नसती.

किंबहुना दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. किंबहूना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल..

मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते, असं प्रत्त्युत्तर पडळकरांनी वडेट्टीवारांना दिलं आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

ते नवीन उगवलेलं गवत आहेत

विजय वडेट्टीवारांनी गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, “पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता राजकारणात आले आहेत. ते नवीन उगवलेलं गवत आहेत. त्यांना अजून आपलं मूळ सापडलेलं नाही. अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला हा व्यक्ती आहे. ती कमिटी स्थापन करायचं काम मी केलं आहे. त्या पडळकरांना काय माहीत आहे?, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

तोपर्यंत निवडणूका घ्यायच्या नाहीत

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत निवडणूका घ्यायच्या नाहीत. कालच्या बैठकीत आम्ही तशी भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षानेही हीच भूमिका मांडली आहे. गरज भासल्यास निवडणूका तीन महिने पुढे ढकलू, असं त्यांनी स्पष्ट केलं. समजा आरक्षणचा निर्णय झाला नाही तरी आम्ही ओबीसींना जागा देऊ. त्या त्या ठिकाणी 33 टक्के ओबीसी उमेदवार देऊ, असंही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले पडळकर?

“महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी ,भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलं आहे, पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात येत आहे. हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, MPSC च्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये, ओबीसींच्या राजकीय आरक्षणबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून ‘सेन्सेस डेटा आणि इंपेरिकल डेटा’ यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये, अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलं आहे”, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत त्यांचा आक्रोश मांडला आहे. “ओबीसींच्या आरक्षणा संबंधी, शासकीय लाभ व सवलती संदर्भात आणि ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांचा समग्र अभ्यास करून मंत्रीमंडळाला शिफारस करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीला आता वर्ष होत आलं आहे. बरं या समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती. ओबीसींसाठी मोठ्या वल्गना करणारे,ओबीसींवरील प्रेम दाखवत आणाभाका घेणारे आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले महाविकास आघाडी सरकारमधील ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांचा फौज फाटा या उपसमितीमध्ये होता. दिग्गजांची मांदीयाळी या समितीत असताना यांनी वर्षभरात ओबीसी प्रश्नांवर नेमका कोणता अभ्यास करून अहवाल सादर केलाय, हे कळायला मार्ग नाही.

म्हणूनच सामान्य ओबीसी जनतेला ही फक्त ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांची ‘मांदीयाळी’ नसून ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असे वाटायला लागले आहे. ही उपसमिती गेल्या वर्षभरापासून स्थापन झाली आणि स्थापन होताच ‘अदृश्यही’ झाली”, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे

News Desk

नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल!

News Desk

कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं 

News Desk