HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथराव नाहीत म्हणून आज सत्ता गेली ! जानकरांची खंत

बीड । “मुंडे साहेब आज असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते. गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली”, अशी खंत रासप नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (३ जून) आयोजित हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीचा होता. महादेव जानकर यांनी गोपीनाथ गडावर देखील हजेरी लावली होती. दरम्यान, त्यानंतर TV9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो !

“बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो.

गोपीनाथराव हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते. मी पंकजा मुंडेंच्या सुखापेक्षा अधिक दुःखात सहभागी आहे. मुंडे साहेब आज असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते. गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली. मात्र रासप NDA सोबतच आहे”, अशा शब्दांत महादेव जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ओबीसींच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षण देऊ नका !

महादेव जानकर पुढे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं ही जाणीव पावलापावला वर होते. आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. येत्या काळात ओबीसींचं नेतृत्व हे पंकजा मुंडेंनी करावं आणि पंकजा ते करत आहेत. ओबीसींच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षण देता कामा नये”, असा इशाराही यावेळी महादेव जानकर यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

News Desk

गणेशोत्सवापूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा! – रवींद्र चव्हाण

News Desk

“भालाफेकीत भारताला सुवर्णपदक”, नीरज चोप्राची चमकदार कामगिरी!

News Desk