मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळात केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची सक्ती होती. मात्र, काही कर्मचारी गावी निघून गेल्याने किंवा अन्य कारणाने सुट्टीवर होते. आणि त्याचा ताण रोज कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत होता. मात्र आता,सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात कामावर रुजू व्हावे अन्यथा त्यांना पगारकपातीला सामोरे जावे लागेल असे सरकारने म्हटले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा कामावर रुजू व्हावे असे आदेश सरकारने दिले आहेत. ८ जूनपासून सरकारी कार्यालये सुरु होणार आहेत. अशात आठवड्याभरातून एकदा कार्यालयात कर्मचाऱ्यांनी हजर राहावे असे आदेश काढण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे रोस्टर तयार करावे, ज्यामध्ये प्रत्येकाला आठवडण्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहावे लागेल. वैद्यकीय कारणास्तव रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळता सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळात परवानगी न घेता मुख्यालय सोडले आहे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना सरकारने दिली आहे. तसेच, आठवड्यातून एकापेक्षा जास्त दिवस कर्मचारी हजर राहिला असेल ते वगळून त्या आठवड्यातील अन्य दिवसांची अनुपस्थिती देय विनावेतन रजा म्हणून नियमित करण्यात येणार आहे. हा आदेश ८ जून पासून लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारचे सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, आस्थापना यांना हा आदेश लागू राहणार आहे.
Govt staff must report to work once a week during #COVID19 lockdown or face pay cut: Maharashtra govt
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.