HW News Marathi
महाराष्ट्र

उद्यापासून सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर…

मुंबई | राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. उद्यापासून तीन दिवस हे कर्मचारी संप पुकारणार आहेत. या संपामध्ये मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 17 लाख कर्मचा-यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उद्यापासून पुढे तीन दिवस हा संप सुरु रहाणार आहे.

सोमवारी झालेल्या समन्वय समिती संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तीन वर्षांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सातवा वेतन आयोग, थकीत महागाई भत्ता, कर्मचारी भरती, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे रजा, अनुकंपा नियम दुरुस्ती, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, आरोग्य खात्यातील परिचरांना किमान वेतन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे आदी मागण्यांसाठी हा संप असणार पुकारण्यात येणार आहे.

आज सोमवार दि. 6 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत सर्वानुमते 7,8 व 9 ऑगस्ट रोजी मागण्या मान्य होईपर्यंत संप करण्याचे ठरले. शिक्षक भारतीच्या वतीने राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे बैठकीला उपस्थित होते. राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही सातवा वेतन आयोग आणि इतर सवलती हव्या असल्याने ते सरकारी कर्मचाऱ्यांसोबत या संपात उतरतील अशी ग्वाही अशोक बेलसरे आणि सुभाष मोरे यांनी दिली. उद्यापासून कडकडीत संप. सर्व शाळा बंद रहातील अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव !

News Desk

गलिच्छ स्तराच्या राजकारणामुळे अजित पवारांनी दिला राजीनामा | शरद पवार

News Desk

चुकीचं काहीही केलं नाही, सोमय्या केवळ बदनामी करताहेत; अनिल परब यांचा दावा!

News Desk