HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणासाठी शहा आणि फडणवीस यांची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली | राज्यात मराठा आरक्षणावरुन आंदोलन पेटले आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन मराठ्यांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसली असे अनेक आरोप त्यांच्यावर होत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी 7 वाजता बैठक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

बैठकीला राज्य प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्रातील खासदार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर ठिय्या आंदोलन सुरू आहेत, मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत, त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलवली असल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार

News Desk

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणता म्हणजे शंकेची पाल चुकचुकतेच !

News Desk

अमेरिका-युरोपकडे न पाहता आपले युद्ध आपणच लढण्यात शौर्य आहे !

News Desk