HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार कटिबद्ध आहे !

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरवत या समाजाला शिक्षण क्षेत्रात १३% तर नोकरीत १२% आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर धनगर समाजाला एक मोठे आश्वासन दिले आहे. “देवाच्या साक्षीने सांगतो, धनगर समाजाला आरक्षण देणारच. हे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे”, असे विधान जानकर यांनी केले आहे. ते शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील एका कार्यक्रमादरम्यान जानकर बोलत होते.

“चुकीच्या अहवालामुळे धनगर आरक्षण अडकले. धनगर आरक्षणासाठी कमिशन नेमलेले असून अद्याप त्यांचा अहवाल यायचा बाकी आहे. देवाच्या साक्षीने सांगतो, धनगर समाजाला आरक्षण देणारच. हे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे”, असे देखील महादेव जानकर यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे एसटी जातीतील बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या सवलती मिळणार असल्याचे देखील जानकर यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने आता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी !, फडणवीसांचा खोचक सल्ला

News Desk

शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची छगन भुजबळांनी केली मागणी

Aprna

मराठा आरक्षण आणि कोरोनावर सरकारनं अधिवेशन बोलवावं, चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk