HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारच्या दडपशाहीचा विद्यार्थी संघटनेकडून निषेध

मुंबई | धुळे शिरपुर येथील रावसाहेब पाटील, मनोहर भिडे यांच्या समर्थकांनी यांनी भिमा-कोरेगावचा आकडा गाठता येत नसल्यास तो आकडा मुख्यमंत्री देवन्द्र फडणवीस आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांचा खुण करुन पुर्ण करावा अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती, त्याची माहीती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. त्याला जवळपास अडीज महीने उलटले आहेत. तरीही रावसाहेब पाटील यांच्यावर कारवाई केली गेली नाही.

२६ मार्चच्या एल्गार मार्च च्या प्रतिनिधींना मुख्यमंत्री विधानभवनात भेटले त्यावेळी रावसाहेब पाटील यांच्या पोस्टची माहीती प्रत्यक्षात दिली होती. प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्याच्या भेटीवेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त देवेन भारती आणि गृहसचिव यांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील यांच्यावर कारवाई करु आणि आठ दिवसात गुन्हा दाखल करु, असे सर्वांसमोर आश्वासन देणारे मुख्यमंत्री चोर सोडुन सन्याशाला फाशी द्यायला निघाले आहेत.

आज २१ दिवस उलटुन गेल्यानंतर रावसाहेब पाटलांवर कारवाई नाही तर कारवाई एल्गार मोर्चाच्या संयोजकांवर होत आहे. एल्गार परिषदेचे संयोजक कबीर कलामंच,रिपब्लिकन पॅन्थर यांच्या कार्यकर्त्यांवर पुणे, मुंबई येतील राहत्या घरांवर आणि कार्यालयांवर सकाळी ६ वाजता पुणे पोलिसांचे पथक सर्च वॉरन्ट घेऊन या कार्यकर्त्यांना धमकावीत आहेत.

१७ एप्रिल रोजी केलेले हे छापेसत्र ही लोकशाहीवादी कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आहे. असे सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य कमिटीचे मत बनले आहे. या सर्व दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. भिमा-कोरेगाव प्रकरणात आरोपी असलेले संभाजी भिडे यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्र शासनाने केलेली धडपड आहे असे सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थी संघटनेचे मत बनले आहे. तत्काळ हे छापेसत्र थांबावे अन्यथा महाराष्ट्रातील २६० संघटना आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन सोबत येऊन सरकारच्या या दडपशाहीचा प्रतिकार करायला मोठ्या संख्येन रस्त्यावर उतरतील असा इशारा सम्यक आंदोलन विद्यार्थी संघटनेकडून देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

OBC Reservation : निवडणुकांना स्थगिती नाही; आयोगाकडून नव्या तारखा जाहीर

News Desk

राज्य सरकार आणि समता परिषदेच्या विधिज्ञांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

Aprna

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat
मुंबई

वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला’ प्लास्ट इंडियाची साथ

News Desk

विरार | पर्यावरणप्रेमी आणि वकील अफरोज शाह यांच्या नेतृत्वाखालील ‘वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात मोठ्या समुद्र किनारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्सोवा किना-यावर प्लास्टिकचे साम्राज्य दिसत आहे. या किना-याची स्वच्छता करण्यासाठी अफरोज शाह यांना सहकार्य करण्यासाठी प्लास्ट इंडिया फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेसाठी प्रसिद्ध अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक एक्सकेव्हेटर आणि ट्रॅक्टर दिला आहे.

या उपकरणांच्या हाताळणीचे काम प्लास्ट इंडिया फाउंडेशन एक वर्षाकरिता करणार आहे.या फाउंडेशनने बिईंग ओशियन फाउंडेशनच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. गेले 137 आठवडे ही संस्था समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक हटवण्याचे काम करत असून 13 द्शलक्ष किलो प्लास्टिक आणि कचरा स्वच्छ केला आहे. प्लास्ट इंडिया समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी काम करणारे नागरिक, एमसीजीएम आणि स्वयंसेवकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.

प्लास्ट इंडिया फाउंडेशन’ला या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या एक्सकेव्हेटर आणि ट्रॅक्टरची देखभाल आणि मोहिमेच्या खर्चासाठी हातभार लावण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंद आहे. समुद्राच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचा अस्वच्छ पाणी, कचरा, प्लास्टिक टाकू नये यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. वर्सोवा किनाऱ्याची मोहीम यशस्वी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याच प्रकारची मोहीम अन्य किनाऱ्यांवर राबवता येईल. नागरिकांचा यात सक्रीय सहभाग असला तरच हे शक्य होऊ शकते. आणि देश स्वच्छ व सुंदर होऊ शकेल. समुद्र किनाऱ्यावर कचरा फेकू नका, किनारे अधिक सुंदर बनवा, देशाच्या प्रगतीला हातभार लावा’.असा आमचा साधा, सरळ संदेश असल्याचे प्लास्ट इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष के. के. सेकसरीया यांनी सांगितले.

या मोहिमेबाबत ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ हा पर्यावरण रक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळवलेले अफरोज शाह यावेळी म्हटले की ‘ या उपक्रमाला मी माझा वैयक्तिक प्रवास केला आहे आणि 1.6 अब्ज लोकांनीही याला आपल्या आयुष्याचा भाग बनवला पाहिजे. असे झाले नाही तर तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रातील माणसे यांच्यात विसंवाद होत राहील, आणि त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. देशाभिमान आणि देशाविषयी प्रेम सकारात्मक पद्धतीने बाह्यस्वरुपात देखील व्यक्त झाले पाहिजे.

 

Related posts

लोकसभेत आठवलेंना विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार

swarit

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण

News Desk

‘साई संस्थेचा’ प्लास्टिक बंदीला मोलाचा हातभार

News Desk