HW News Marathi
Covid-19

सरकारने नोकरभरती रद्द न करता १ वर्षासाठी किमान वेतन द्यावे !

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे अर्थचक्र सध्या अडकून पडले आहे. राज्य सरकारपुढे सध्या या आर्थिक संकटाचे मोठे आव्हान आहे. म्हणूनच राज्य सरकारकडून आधीच रखडलेल्या तब्बल ७० हजार जागांच्या मेगाभरतीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील युवकांचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. “राज्य सरकारने नोकरभरती रद्द न करता एका वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे.

“कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा एज बार होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल आणि याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. राज्य सरकारने जर नोकरभरती रद्द केली तर अनेक युवा उमेदवार पुढच्या वर्षी वयाच्या निकषात बसणार नाहीत. या युवकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहित पवारांनी ही मागणी केली आहे.

इतर राज्यातून आलेले मजूर स्वगृही जात असल्याने ज्या रोजगार संधी उपलब्ध होतील त्याचा मराठी मुलांनी फायदा करून घ्यावा. ते काम कमीपणाचे समजू नये, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे. “लॉकडाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा व आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनु सूदवरून महाविकासआघाडीतले मतभेद उघड !

News Desk

अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला, आता अजून कडक निर्बंध लागू

News Desk

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

News Desk