HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा – अॅड. डॉ. सुरेश माने

मुंबई. भीमा कोरेगाव प्रकरणी दलित हल्ले प्रकरणी निश्क्रिय भूमिकेत असलेली पुलिस व सरकारी यंत्रणा 3 जानेवारी बंद दरम्यान झालेल्या घटना वर अतिसक्रिय झाली आहे त्यात महाराष्ट्रात सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केली आहे.

डॉ. माने म्हणाले की, दिनांक 29 डिसेंबर 2017 व त्याही अगोदर काही दिवस ज्यांनी पूर्व नियोजित कटकारस्तान करुन 29 डिसेंबर 2017 रोजी मुक्काम पोस्ट वढु येथील शूरवीर संभाजी राजे यांच्या समाधी जवळ असलेली गोविंद गायकवाड यांची समाधी ध्वस्त केली व दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगांव भीमा येथे येणाऱ्या जनतेवर सशस्त्र हल्ले केले त्या कटाचे सूत्रधार, त्या कटात सहभागी झालेले आजूबाजूच्या गावातील जातीयवादी माथेफिरु हे मोकाट फिरत असताना व त्यांचेवर सरकार, पुलिस यंत्रणेचा आशिर्वाद असताना 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद दरम्यान त्याच जातियवादी शक्ती आणि प्रवृत्तीनी खुलेपणाने पुन्हा एकदा निरपराध आंबेडकरी जनतेवर हल्ले केले, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले व त्यांच्या अस्मिता-प्रतिमांची खुलेआम मोडतोड करुन अवमानना केल्यामुळे बंद रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत शांततामय मार्गाने बंद मध्ये सामिल झालेली आंबेडकरी जनता संघर्षात उतरणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया असताना व बंद दरम्यान काही जातीय शक्तिंद्वारे व असामाजिक तत्वांद्वारे सरकारी मालमत्तावर हल्ले करणे, पोलिसांवर प्राणघातक हल्ले करणे असे खोटे आरोप बनवून 1 जानेवारी 2018 रोजी दलित हल्ले प्रकरणी निश्क्रिय भूमिकेत असलेली पुलिस व सरकारी यंत्रणा 3 जानेवारी बंद दरम्यान झालेल्या घटना वर अतिसक्रिय झाली असून संपूर्ण राज्यभर, रात्री-अपरात्री, स्त्री, लहान मुले-मुली, विद्यार्थी व 80-85 वर्षाचे वयोवृद्ध यांच्यावर अमानुश अटकसत्राद्वारे व 307, 333, 395 व इतर भारतीय दंड संहिता चे कलमांचा बेसुमार वापर करुन सरकारी दहशतवाद पसरवित असून आम्ही त्याचा जाहिर निषेध करीत आहोत व तो कोणत्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे यासाठी सरकार, पुलिस यंत्रणा यांना विनंती व सूचना करीत आहोत की सरकारने हे त्वरीत न थांबविल्यास लवकरच यामुळे सरकार विरोधी उद्रेक कोणत्याही मार्गाने प्रकट होऊ सकतो, अशा इशारा राज्य सरकार व पुलिस यंत्रणेला देत आहोत. शिवाय असे घटनाबाह्य व कायद्यांचा गैरवापर करुन व पुलिस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या सर्वांविरुद्ध न्यायालयीन व इतर प्रक्रियेद्वारा कारवाई करण्याचा जाहीर इशारा देत आहोत. राज्यातील दंगल प्रभावित आंबेडकरी-बहुजन जनतेने संघर्षाची कास न सोडता अशा कठीन प्रसंगास धाडसीपणाने सामोरे जावे व आपल्यावरील अन्यायाचा, अत्याचाराचा, अपमानाचा बदला 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपली स्वतंत्र शक्ती दाखवून द्यावी असे आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत. त्याचबरोबर राज्यातील सर्व बहुजनवादी, आंबेडकरवादी संघटना, नेते, पक्ष व गैर-कांग्रेस गैर-भाजपा समर्थक पक्ष नेते, संघटना यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी, वंचित वर्गाच्या सुरक्षिततेसाठी, व किमान समान व सर्वमान्य कार्यक्रमांवर आधारीत रणनीति बनविणे, संघर्श करणे, ही काळाची गरज लक्षात घेवून सर्व संबंधीतांनी तत्परतेने यावर निर्णय घ्यावे असेही डॉ. माने यांनी जाहिर अपील केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंगांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपचा तपास आता CBI करणार

News Desk

कंगनाच्या ‘त्या’ तुम्ही तिला कधी फोन करणार? कॉंग्रेसचा NCBला प्रश्न  

News Desk

राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे लवकरच वितरण करणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna