HW News Marathi
महाराष्ट्र

‘मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ’ राऊतांचे सुचक ट्विट

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने आज (२९ डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ईडीसमोर हजर होण्यासाठी५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. या दरम्यान संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एक शायरी ट्विट केली आहे. ‘तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की, मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ’, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच, आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच भाजपाने सुशांतसिंगच्या आत्महत्येचा केला वापर, कॉंग्रेसचा आरोप

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

Aprna

नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले?

News Desk