HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त आमदार ठरण्याची शक्यता, राष्ट्रवादी राजू शेट्टीना दिलेला शब्द पाळणार?

मुंबई | आज (१४ ऑक्टोबर) राज्यपाल नियुक्त आमदार ठरण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून अखेर नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूण १२ जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे या जागांवर राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या १२ जागांपैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल असे म्हटले जात आहे. तर उर्वरित जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजत आहे. यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावीचा निकाल : यंदाही मुलींची बाजी, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

News Desk

भुजबळांमुळे माझा विजय

News Desk

राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले, तर देशमुख जाण्याच्या तयारीत’, अतुल भातखळकरांची टीका!

News Desk