HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, कॉंग्रेसचा उपरोधिक टोला   

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी असल्याचा उपरोधिक टोला पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी लगावला आहे. ते विधानसभेत बोलत होते. विधानभवनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर झालेल्या भाषणात आमदार संजय जगताप यांनी राज्यपालांवर टीका केली. एकीकडे राज्यपाल कोरोना काळातील कामगिरीबद्दल सरकारचे कौतुक करतात, दुसरीकडे राज्यपाल राज्य सरकारशी संघर्ष करतात.

राज्यपालांची ही कृती म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार कन्हैयालाल चतुर्वेदीसारखी असल्याची खोचक टिप्पणी संजय जगताप यांनी केली. १२ आमदारांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळी संजय जगताप यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती विधानभवनात दिली आहे.

नेमका राज्य सरकार-राज्यपाल वाद काय आहे?

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवून कित्येत महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकवेळा टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपधार्जीणे असल्याचं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा म्हटलेलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे मोठ्या मुश्किलीने १२ आमदारांच्या नावांवर एकमत झाले होते. त्यानंतर या नावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी सरकारची भूमिका राहिलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने राजभवनाशी अधिकृतपणे अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजूनही १२ आमदारांची यादी राज्यपालांच्या दफ्तरीच पडून आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

कोरोना संसर्गविरोधात कोथरूडमध्ये निर्जंतुकीकरणचा चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

swarit

भास्कर जाधवांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया..!

News Desk