HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राला मोठा दिलासा ! कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमालीची घट

मुंबई । महाराष्ट्राला एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की आज (२६ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल 71 हजार 736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी !

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी 6 पर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अदार पुनावाला हे पुण्याचे, महाराष्ट्राला झुकतं माप द्यावे !

News Desk

स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर कोमात ! ‘लोकल’च्या वादात रोहित पवारांची उडी 

News Desk

सीरम इन्स्टिट्यूट आणि  Novavax च्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात 

News Desk