HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे-मंगल लोढांची भेट, BMC निवडणुकीसाठी रणनिती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि मनसे अधक्ष राज ठाकरे यांनी काल (२० फेब्रुवारी) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पालिका निवडणुकीसाठी  भाजपने एकाल चलोचा नारा दिला होता. परंतु, यात राज ठाकरेंसोबत लोढांनी घेतलेली भेट वैयक्तिक असल्याचे सांगितले. तरी देखीय बड्या नेत्यांच्या भेटीमुळे राज्याचे राजकारणात चर्चाचा विषय झाले आहेत. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडूण लढली नव्हती. परंतु, राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सभा घेतल्या होत्या आणि. ‘लाव तो व्हिडीओ’ म्हणत मोदींनी देशातील जनतेला दिलेल्या वचन यांची सत्यता तपासली. मात्र, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे चित्र बदले गेले. आणि राज्यात महाविकासआघाडी उदयास आली. यामुळे आता राज्यात पालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु, यासंदर्भात दोन्ही पक्षाकडून अद्यापही अधिकृत असे काही आले नाही. 

 राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन लोढा यांनी काल भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून या दोन्ही नेत्यांची वैयक्तिक भेट असलयाचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसात दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे बीएमसीच्या राजकारणात काय परिणाम होईल. याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या राजकीय बुद्धीवर पंकजा मुंडे यांनी केला सवाल!

News Desk

चंद्रकांत पाटलांनी पदविधारांसाठी काय केलं? | जयंत पाटील

News Desk

भंडाऱ्यात सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा! – मनीषा कायंदे

Aprna