HW News Marathi
महाराष्ट्र

सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही! – मुख्यमंत्री

मुंबई | “देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. आमची तशी परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (२० फेब्रुवारी) वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली.  भेटीनंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. राव यांनी उद्धव ठाकरेंना हैदरबादला येण्याचे निमंत्रण दिले आहे. या दोघांची भेट ही भाजपविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. आमची तशी परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही. देशाला परिवर्तनच्या मुद्यावर एकमत झाले आहे. आम्ही देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी राव यांची भेट झाली हे आमचे भाग्यच असून आमची ही सदिच्छा भेट होती,” असे ते म्हटले.

आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत – के. चंद्रशेखर राव

के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, “महाराष्ट्र आणि तेलंगणा हे दोन्ही भाऊ लागतात. कारण आम्ही हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. आम्ही देशातील आणखी काही नेत्यांशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत. आम्ही दोघांनी भारताला स्वांतत्र्य मिळून ७५ वर्षे झालीपासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोललो आहोत. मला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून खूप आनंद झाला आहे. उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचे आमंत्रण दिले आहे.” राव पुढे म्हणाले, भाजप केंद्रीय तपास यंत्रणंचा गैरवापर करत असून मी याचा निषेध करतो. केंद्र सरकारने आपली धोरणे बदलायला हवेत नाही तर त्यांना पुढे सर्व भोगावे लागणार आहे”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार ,शरद पवार,धनंयज मुंडे यांनी संजय राऊत  यांची घेतली खासमखास भेट !

News Desk

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार! – मुख्यमंत्री

Aprna

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

News Desk