मुंबई। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणत मंगळवारी १८०० गणेशभक्तांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ मुंबईहून कोकणात रवाना झाली. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेली ही मोदी एक्सप्रेस आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी कोकणाच्या दिशेने प्रवास करण्यास निघाली. यावेळी चाकरमान्यांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. त्यामुळे कोकणवासियांचा विचार करता नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात घोषणा केली होती. अखेर आज गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ ने कोकणाकडे प्रवास सुरू केला.
प्रवाशांना एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार
दादर ते वैभववाडी करून सावंतवाडीत ही ट्रेन थांबणार आहे. १८ डब्ब्यांची असणारी ही मोदी एक्सप्रेस १८०० प्रवाशांना घेऊन कोकणाकडे प्रवास करत आहे. मुंबई ते सावंतवाडी या प्रवासात सर्व प्रवाशांना एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे. दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सोडण्यात आली असून मोठ्या उत्साहामध्ये या गाडीमधील प्रवाशांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना बाप्पाची आरती म्हणत या प्रवासाचा श्रीगणेशा केला.
#modiexpress all set !
Ganpati bappa morya!! pic.twitter.com/53kr5TuLAW— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2021
महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मोदी एक्सप्रेसमध्ये येऊन प्रवाशांना अन्न वाटप केले. यासोबतच प्रवास करताना आणि कोकणात गेल्यावरही कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावूनच घराबाहेर पडा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या. यासोबत मोदी यांच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश असल्याचे दानवे म्हणाले. नितेश राणेंनी आज या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याआधीचे काही फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले. यामध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणत त्यांनी मोदी एक्सप्रेस ट्रेनचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.