HW News Marathi
देश / विदेश

एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया ! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई | राज्य तसेच केंद्र सरकारच्या आवाहनानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच सण अत्यंत सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच उद्या (२५ ऑक्टोबर) विजयादशमी आहे. याच पार्श्वभूमीवर, विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत एक आवाहन केले आहे. “कोरोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल”, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

“विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया. कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वच धर्मींयानी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत”, असे म्हणत पुढे मुख्यमंत्र्यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

“आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेसाठी गर्दी न करण्याचे-शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल”, अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेट एअरवेजचे चेअरमान नरेश गोयल यांचा राजीनामा

News Desk

सेल्फी घेणा-या युवकाला हत्तींनी चिरडले

News Desk

“राष्ट्रपतींचं भाषण इतकं प्रभावशाली होतं की न ऐकताही सदस्य बरंच बोलले”, मोदींचा राज्यसभेत विरोधकांना टोला  

News Desk