HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरु राहणार! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहेच. या काळात राज्यभरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमधून काही घटकांना सूट देण्यात आलीय. पण किराणा दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे, आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु – अजित पवार

राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Related posts

मराठा आरक्षण | १५ जुलैला अंतरीम आदेशासाठी सुनावणी होणार, पदव्युत्तर अभ्याक्रमातील आरक्षणावर तेव्हाच निर्णय होण्याची शक्यता

News Desk

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी २ सदस्यीय समितीची स्थापना

rasika shinde

राज्यात आज १२ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित तर ३०२ मृत्यू

News Desk