HW News Marathi
Covid-19

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले असून शशिकांत शिंदे हे पवारांचे निकटवर्तीयपैकी एक मानले जातात. राष्ट्रवादीकडून या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल (९ मे) ट्वीट करत राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती दिली. तर भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने ८ मे रोजी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नावे ४ मे रोजी निश्चित झाले आहे.

विधानपरिषदेतील असे आहे संख्याबळ

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११५ सदस्यांचा पाठिंबा आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता | शशिकांत शिंदे

“मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, मला संधी मिळाली तर आजवर लोकांसाठी काम केले. तसेच काम करेन,” असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. विधानपरिषदेवर राष्ट्रवादीकडून इच्छुक आहात का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले ,”शेवटी विधानपरिषदेवर संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतात. पण संधी मिळाली तर लोकांची सेवा करेन,” विधानपरिषदेवर शशिकांत शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे.

शशिकांत शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, शिंदेना पराभवाचा सामना करावा लागला. शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांना सुद्धा धक्का बसला होता आणि ते श्रीनिवास पाटलांच्या विजयाचा आनंद साजरा करायला साताऱ्याला गेले नव्हते. शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांचे नाते अत्यंत जवळचे आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावान म्हणून त्यांचे विधानपरिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

आज कोरोनाचे १०२६ नवीन रुग्ण, राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण

News Desk

परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे 

News Desk