HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश 

मुंबई | ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने 35 लाखांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला.

संपूर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत.

याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने 35 लाखांचा धनादेश देण्यात आला.

Related posts

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

News Desk

पश्चिम रेल्वेची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

News Desk

लॉकडाऊन काळात कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत ६३ हजार गुन्हे दाखल, पोलीस विभागाची माहिती

News Desk