मुंबई। राज्यात गेल्या दोन दिवसांपासून दंगल सदृश्य परिस्थिती झाली आहे. यात विशेषतः नांदेड अमरावती आणि मालेगाव या शहरांमध्ये परिस्थिती हाताबाहेर असल्याच चित्र निर्माण झालं होतं. आणि आता अश्यातच नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीने मात्र आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं त्यांनी अभिनंदन करत विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी ६० जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 13, 2021
नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी
तर या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यास देखील म्हणालेत की, गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.पोलिस आणि नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत
मिलिंद तेलतुंबडे हा ठार
शनिवारी झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. 1 मे 2019 रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. त्याच्यावर 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.