HW News Marathi
महाराष्ट्र

धाकलगाव येथील विद्यार्थी,शेतकऱ्यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

जालना। अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील विद्यार्थी, आणि शेतकऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच गावात निधी संकलन करून कर्मचाऱ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला आर्थिक मदत केली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी मागील १५ दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचीही मागणी असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने तातडीने एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करावी. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत कर्मचारी बांधवांना गावागावात फिरून निधी संकलन करून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.

यावेळी विद्यार्थी विष्णू नाझरकर ,सुनील गायकवाड ,पोपट खंडागळे, शेतकरी विजय नाझरकर, सरपंच बळीराम शेडगे, दीपक नाझरकर साळीकराम बाळसराफ,रोहित बनसोडे, अरबाज काझी,अर्जुन शेंडगे,प्रभू बाम्हणे,सतीश ढोणे आदींची उपस्थिती होती.एक विद्यार्थी म्हणून माझ्यासाठी एसटीचे योगदान राहिले आहे .एसटी नसती तर माझे शिक्षण पूर्ण झाले नसते त्यामुळेच आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत आहोत,असे विद्यार्थी विष्णू नाझरकर यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूज व्हा

एसटीचे विलीनीकरनाची मागणी त्यांची आग्रही होती. पण, ती मान्य होऊ शकत नाही. कारण हे प्रकरण न्यायालयात आहे, असे मत राज्याचं परिवहन मंत्री अनिल परब म्हणालं. १२ आठवड्याचा कालावधी कमी करण्याची मागणी झाली. त्यावर कालावधी कमी करून अहवाल लवकर देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिले.कर्मचाऱ्यांच्या संपावर आज (१३ नोव्हेंबर) तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूज व्हा, असे आवाहन परबांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. एसटी खूप नुकसानामध्ये असल्यामुले संप मागे घ्यावा, असं आवाहन परबांनी केले.

संप मागे नाही – पडळकर

एसटीच्या बैठकीत आज कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे अद्याप संप मागे घेतला नाही, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पण, १२ आठवड्यांची मुदत कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत सरकार काही करू शकत नाही, अस सरकारच म्हणणं असल्याचे पडळकरांनी सांगितलं. आता आझाद मैदानात जाऊन आम्ही कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संप कायम ठेवायचा की नाही यावर निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअर इंडियाला येणार ‘अच्छे दिन’?; सरकारने टाटांची बोली स्वीकारली, लवकरच होणार मालकी हस्तांतरण

News Desk

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळेल या अनुषंगाने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार- डॉ. गोऱ्हे नीलम

News Desk

शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार जाहिर

News Desk