HW News Marathi
महाराष्ट्र

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

गडचिरोली | अहेरी शहरात सर्व सोईयुक्त बाजारवाडी नसल्याने अनेक विक्रेते हे अहेरीच्या मुख्य रस्त्यावर व इतर ठिकाणी आपले दुकान थाटून बसायचे ह्यामुळे पायदळ चालणाऱ्या लोकांना व दुचाकी चारचाकी वाहनांना प्रचंड त्रास होत होता त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोईयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला 1 कोटी 50 लक्ष रुपये हे सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले होते.

या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडी मधील विविध विकासकामे पूर्ण झाले असून त्या विकासकामांचे नुकतेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले,1.5 कोटी रुपयांचा निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडीचे पूर्ण रूपच पालटले असून बाजारवाडीत भाजीपाला व इतर विक्रेत्यांसाठी सुसज्ज ओटे बांधण्यात आले आहे, तसेच बाजारवाडीत अंतर्गत सिमेंट रस्ते व नालीचे ही बांधकाम करण्यात आले आहे तसेच सर्व विक्रेतानां लाईटची व इतर सर्व प्रकारचे सोई ह्याठिकानी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने विविध प्रकारच्या विक्रेत्यांना व लोकांना मोठी सोय होणार आहे.

अहेरी शहरातील अनेक प्रभागात अंधाराचे साम्राज्य होते त्यामुळे त्याठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याची लोकांची मागणी होती,ह्याची दखल घेत अहेरी नगर पंचायत तर्फे महाराष्ट्र सरकार कडून मिडणाऱ्या नवीन नगर पंचायत सहाय्य योजनेतून 30 लक्ष रुपये खर्च करून शहरातील विविध प्रभागात 11 हायमास्ट लाईट लावण्यात आले होते. त्याचेही लोकार्पण पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे, त्यामुळे अंधाराचे साम्राज्य संपुष्टात येणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमाला जि. प. समाजकल्याण सभापती माधुरीताई उरते, नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे,नगर पंचायत उपाध्यक्ष कमलताई पडगेलवार, उपविभागीय अभियंता (बांधकाम) मेश्राम साहेब, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार,नगर पंचायत सभापती नारायण सिडाम,सुवर्णा येमुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे,पप्पू मद्दीवार, शँकर मगडीवार, सरफराज आलम, सचिन पेद्दापल्लीवार, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार,संतोष येमुलवार सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांसबोत महत्त्वपूर्ण बैठक सुरू, पुढील रणनीती ठरणार

News Desk

औरंगाबादच्या कचराकोंडीला राज्यसरकारही जबाबदार | उद्धव ठाकरे  

News Desk

कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट- IMD

News Desk