HW News Marathi
महाराष्ट्र

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

मुंबई। पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शनिवारी पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार गोरे यांचा शनिवारी (२४ डिसेंबर) फलटण येथे अपघात झाल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विषयी माहिती मिळताच पालकमंत्री देसाई यांनी तातडीने नागपूर येथून पुणे येथे येत आमदार  गोरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री  देसाई यांनी आमदार  गोरे यांची दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री महोदयांशी बोलणेही करून दिले.

पालकमंत्री देसाई यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली व आमदार गोरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. आमदार गोरे यांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.

तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व सबंधित अधिकारी यांच्याशी ही चर्चा केली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, धैर्यशील कदम, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मुनोत यांच्यासह आमदार गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊतांची राहुल गांधींसोबत बैठक’,राऊतांनी सांगितलं भेटीमागचं कारण!

News Desk

वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर

News Desk

शिवसेना-भाजप युतीवरून चंद्रकांत खैरेंचा अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर

Aprna