HW News Marathi
Covid-19

मुंबई पाठोपाठ पुण्यातही होळी, धुळवडीवर निर्बंध, पालिकेने जारी केली नियमावली

पुणे | राज्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. २८ मार्चला होळी सण आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ मार्चला येणारी धुळवड हे दोन्ही सण वाढत्या कोरोनामुळे पुणेकरांना साजरे करण्यावर पालिकेने बंदी घातली आहे. मुंबई महापालिकेनेही निर्बंध जारी केले आहेत.

दरम्यान राज्यात कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईसह पुण्यात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहत यंदाही पुणेकरांच्या धुळवडीचा बेरंग झाला आहे.दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, चंदीगड, बिहार, गुजरात आणि ओडिसा या भागात भागात होळीसंदर्भातील नियमावली जारी केली आहे.

पुणे पालिकेने जारी केली होळीसंदर्भातील नियमावली-

पुणे पालिकेने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं.

-हॉटेल, रिसॉर्ट तसंच मैदाने, मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी पेटवता येणार नाही आणि रंग उडवता येणार नाही.

-हा सण वैयक्तिकरित्याही साजरा करता येणार नाही असेही पत्रकात नमूद केलं आहे.

-उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असंही पत्रकात म्हटलं आहे.

 

मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी

मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे जे रुग्णालयातील करोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर पदी विनिता सिंघल यांची नेमणूक

swarit

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात, आज १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार

News Desk

राज्यात १५ जूनपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

News Desk