HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचे खंदे समर्थक गुलाबराव चव्हाण यांच्या हाती भाजपचा झेंडा!

सिंधुदुर्ग | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आज (१० ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते. दरम्यान, राजकीय वर्तुळात आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आता नवे वळण काय येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मालवणमधील नारायण राणे यांच्या ‘नीलरत्न’ निवासस्थानी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुलाबराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांच्यासह पुत्र आणि आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड ही भाजपची नेते मंडळीही उपस्थित होती.

राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे.विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहे यावर नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणूकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत.परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही.मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निरुपम म्हणजे परप्रांतीय भटका कुत्रा, मनसेचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल

News Desk

शरद पवारांनी राहुल गांधींवर टिका केली नाही ,ते राहुल गांधींना समजावून सांगतील

News Desk

शेतकऱ्याची विटंबना मीच काय कोणीच करू शकत नाही, ‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंचा युटर्न

News Desk