HW News Marathi
महाराष्ट्र

‘पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो’, गुलाबराव पाटलांचं विधान

जळगाव। भाजप खासदार पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा सध्या रंगात आहे. यातच आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक मोठा विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून नवीन चर्चां साठी वाट मोकळी केली आहे.

शिवसेनेत स्‍थान व सन्‍मान मिळेल

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असंही त्यांच्या समर्थकांचा मत आहे. मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे आहे. यामुळे त्‍यांच्‍या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागत राहील. त्‍यांना शिवसेनेत स्‍थान व सन्‍मान मिळेल; असं पाटील यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करतानाच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

ओबीसी समाजाचे खच्‍चीकरण

भाजप पक्ष ओबीसी आरक्षणासाठी किती आक्रमक आहे हे ते वेळोवेळी दाखवून देत आहेत. भाजप त्यांच्या नेत्यांना तिकीट न देऊन ओबीसी नेत्यांचं आणि समाजाचं खच्चीकरण करत आहे असं गुलाबरानावांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडत्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिटेही दिली नाहीत. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे कुठेतरी खच्‍चीकरण केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुष्काळग्रस्तांना दिलासा, योजनांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

News Desk

कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी वाईन धोरणाविरोधात बोलताना ‘या’ महिला नेत्यांवर केले आक्षेपार्ह वक्तव्य

Aprna

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार? संपूर्ण राज्याचं लक्ष

News Desk