HW News Marathi
महाराष्ट्र

“असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे”,रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप

जळगाव | भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे

“या प्रकारासंदर्भात आपल्याला नुकतीच माहिती मिळाली. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह लिहित असेल, तर त्याची फक्त चौकशीच नव्हे, तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे” अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

रक्षा खडसे काय म्हणाल्या?

“भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी दिली आहे.

माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

News Desk

राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालीये, शेलारांची टिका 

News Desk

ST संपावर पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार

Aprna