HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड दोषी असतील तर गुन्हा दाखल होईल – गुलाबराव पाटील

जळगाव |”संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली आहे. राठोड यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे, चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच मात्र तोपर्यंत अधिक बोलणं उचित होणार नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यानंतर संजय राठोड यांनी आज राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्याची चर्चा रंगू लागली. परंतु राठोड यांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं असल्याचं यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितलं आहे.

संजय राठोड यांच्याविषयी गुलाबराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल.” त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय पाऊल उचलणार? आणि हे प्रकरण कोणत्या दिशेला जाणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

“हे आरोप आहेत. आरोप झाल्यामुळे त्यांची चौकशी सुरु आहे. राठोड सध्या कुठे आहेत आपल्याला माहित नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपण मतदारसंघात व्यस्त आहोत. आज आपण मुंबईला जात आहोत. त्यांची माहिती मिळाली तर आपल्याला सांगेन,” असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबईतील नुकसानग्रस्तांना देखील मदत करा’, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांना मागणी

News Desk

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk

तीन तलाक कायद्याच्या विरोधात जिल्हाअधिकारी कार्यलयावर मोर्चा

swarit