HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर मी भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करीन” – गुलाबराव पाटील

मुंबई | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली होती. तसेच, त्यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर महाविकासआघाडीतल्या एका नेत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे.

“गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना वर स्टेजवर बोलावलं होतं. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल, तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करीन”, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना दिलं आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेला लसीकरणाचा कार्यक्रम आणि उपलब्ध होणारा लसीचा साठा या मुद्द्यावरून देखील गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. “जर राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे. राजकारण कोण करतंय हे गिरीश भाऊंना माहिती आहे. जर लसी पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. पण जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही”, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी, कारवाईला सुरुवात

News Desk

नारायण राणे अजूनही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांची पुन्हा टीका!

News Desk

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम! – नवाब मलिक

Aprna