HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे अजूनही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांची पुन्हा टीका!

मुंबई। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, हा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला. इडीची कारवाई म्हणजे केंद्र सरकारच्या सुडाचं राजकारण आहे. अनिल परब यांनाही अशीच नोटीस देण्यात आली. हे ठरवून केलं जातंय. यंत्रणांचा दुरूपयोग होतोय, असा दावा विनायक राऊत यांनी केला.

काही जरी झालं तरी कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकहिताची कामं करत आहेत, रणनीती आखण्याची गरज नाही. शिवसेनेला वाडीपर्यंत वाढवू, काही जरी झालं तरी कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. जनआशिर्वाद यात्रेबद्दल विश्लेषण केलंय, 75 गाड्या मुंबईतून नेल्या. स्थानिकांचा प्रतिसाद नव्हता, असं राऊत म्हणाले.

कोकणवासीयांनी सावध राहावं

राणेंच्या या नौटंकीनंतर कोकणात राणेयुक्त राडेबाज विकृती फोफावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी सावध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.चंद्रकांत पाटलांसारख्या माणसाने असं वक्तव्य करता कामा नये. केंद्राच्या सूचनेला हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. गर्दीमुळे कोरोना वाढतोय, याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करत, राऊत यांनी भाजपच्या मंदिरांबाबतच्या आंदोलनावर टीका केली.न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, त्याला कोर्ट शिक्षा देईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा, १२ आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!

News Desk

महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – महेश तपासे

News Desk

शाळेत शिकणा-या मुलीकडे देशी कट्टा

News Desk