HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरी | पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (१२ मे) दुपारीच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. दरम्यान, तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे माहिती समोर येत आहे. आरोपीने पिस्तूलातून ४ गोळ्या झाडल्या आहेत.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने आज दुपारी पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपास करत आहेत.

पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नाही आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या घटनेबाबतची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली असून मोठी खळबळ उडाली आहे.

Related posts

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात ,मास्क घालून मंत्र्यांचे कामकाज सुरू…

News Desk

आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

News Desk

पंजाबमध्ये ‘कोरोना’चा पहिला बळी, तर आतापर्यंत देशातील चौथा बळी

अपर्णा गोतपागर