HW News Marathi
Covid-19

पुढील २ दिवसांत राज्यात जिम सुरु होणार ! मनसे-भाजपच्या मागणीची सरकारकडून दखल

मुंबई | “पुढील २ दिवसांत राज्यात जिम पुन्हा सुरु करणार”, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (१४ ऑगस्ट) जाहीर केले आहे. राज्यातील जिम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आज किंवा उद्या याबाबतच्या आदेशावर सही करण्यात येईल, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जिम पुन्हा सुरु करण्याबाबत मनसे आणि भाजपकडून मागणी करण्यात आली होती. जिम चालकांनी याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. तर दुसरीकडे नुकतेच याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. राज्य सरकारने अखेर या मागणीची दखल घेत राज्यातील जिम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले ?

“आज राज्यातील दारुची दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही?”, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यातील जिम सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. तसेच त्यांच्या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे”, असेही फडणवीसांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

तुम्ही जिम सुरु करा, काय होतं पाहू | राज ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिण्यापूर्वी जिम मालक-चालकांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले होते. त्याचप्रमाणे, “केंद्र सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन तुम्ही जिम सुरु करा.त्यानंतर काय होतं ते पाहूया”, असेही राज ठाकरेंनी जिम चालकांना सांगितले होते. त्याचप्रमाणे, “विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांशीही याबाबत मी बोललो आहे. राज्यातील जिम पुन्हा सुरु झाल्या पाहिजेत असे त्यांचेही म्हणणे आहे. तुम्ही जिम सुरु करा. ज्याला यायचं असेल तो येईल. त्यानंतर आपण बघू काय होतं”, असे राज ठाकरेंनी जिम मालक-चालकांना सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज एकाच दिवसात १२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद 

News Desk

#Coronavirus : दिल्लीतील तब्लिगिंची कोरोनावर मात

News Desk

चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk