HW News Marathi
महाराष्ट्र

निकालापूर्वीच मुश्रीफांची विजयी मिरवणूक तर पुण्यात दोडके यांनी बॅनरबाजी

मुंबई | राज्यात काल (२१ ऑक्टोबर) २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात कोणाची सरकार येणार हे चित्र स्पष्ट होईल. निकाल हाती येण्यापूर्वी काही उमेदवारांनी विजयी जल्लोष केला आहे. तर काही उमेदवारांनी मिरवणूक आणि विजय झाल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहे. कोल्हापुरातील कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेच्या संजय घाटगे यांच्यात दुहेरी लढत आहे. मात्र, मतदान पार पडल्यानंतर मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पुन्हा त्यांचा विजय होणार असल्याचे त्यांनी आनंद साजरा केला. मुश्रीफांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलर उडवली.

पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचे संध्याकाळपासून वारजे भागात आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर दोडकेंच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली आणि फटाक्यांची आतषबाजी देखील केली. मात्र, या सर्व उमेदवारांचा हा कान्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स हे येत्या २४ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. तसेच रत्नागिरीतील दापोलीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनीही निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढली. विशेष बाब म्हणजे संजय कदमांनी आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये निकालापूर्वीच विजय साजरा केला आहे. संजय कदम यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांचे तगडे आव्हान आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…ही ‘हेराफेरी ४’ साठी परफेक्ट स्क्रिप्ट, त्यात नवाबला ‘बाबूभाई’चा रोल द्या’, नितेश राणेंचा टोला

News Desk

नामांकित इंग्रजी वृत्तपत्राला मलिकांची नोटीस; जाणून घ्या… काय आहे प्रकरण

Aprna

‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’ – पृथ्वीराज चव्हाण

News Desk