HW News Marathi
महाराष्ट्र

“खाकी वेषातील दरोडेखोर परमबीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं”- हसन मुश्रीफ

मुंबई। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट मिळाल्यावर पुन्हा CBI चौकशीसाठी पुन्हा राजकीय वर्तुळात आता चर्चांना उद्धण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय. चौकशी अहवालातून दूध का दूध पानी का पानी झालंय, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे, असा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे

सीबीआयच्या प्राथमिक अहवालात आमचे नेते अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याची माहिती कळते आहे. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे होते, हे सिद्ध झालंय. दूध का दूध पानी का पानी झालं, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणंं गरजेचं आहे, असा आक्रमक पवित्रा मुश्रीफ यांनी घेतला आहे.

सीबीआयच्या अहवालाने याचा पर्दाफाश

दुसरीकडे मुश्रीफ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटाला परमवीर सिंगच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला. तर अनिल देशमुख निर्दोष आहेत, पक्षाला बदनाम करण्याच हे भाजपचं कारस्थान आहे असं मी वारंवार सांगत होतो. सीबीआयच्या अहवालाने याचा पर्दाफाश केलाय, असं मुश्रीफ म्हणाले. तसंच चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करून देशमुख यांच्यावर अन्याय केला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

नवाब मलिक काय म्हणाले?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा ही सीबीआयची जबाबदारी आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यावर नवाब मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये फिरत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लवकरच पितळ उघडं पाडणार, जमीन पुन्हा मिळवताच पडळकरांचा काका-पुतण्यांना इशारा!

News Desk

मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार, BMC चा निर्णय

News Desk

रेणू शर्मा प्रकरणाचा मुंडे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला – अजित पवार 

News Desk