HW News Marathi
महाराष्ट्र

“राजकीय हेतूने ईडी, सीबीआयचा वापर”, हसन मुश्रीफांचा भाजपवर गंभीर आरोप

कोल्हापूर | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या एक पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी करत राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी,सीबीआय यांचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून वापर होत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज झालेल्या सीबीआय छापेमारीवरून त्यांनी हा निशाणा साधला आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले, कोणताही पुरावा नसताना सीबीआयने ही कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील. अंबानी याच्या घरासमोरील स्फोटके प्रकरणातून परमवीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी धडपड सुरू आहे. दूध का दूध और पाणी का पाणी लवकर होईल, असे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणात बदल होणार नाही | तावडे

News Desk

पोलिसांचे कुटुंबीय पोहोचले कृष्णकुंजवर, राज ठाकरे म्हणाले…..

News Desk

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे बीएमसीची बैठक, ‘त्या’ प्रवाशांना क्वारंटाईन करणार – महापौर

News Desk