HW News Marathi
महाराष्ट्र

हसन मुश्रीफांचा दावा हास्यास्पद, लोकांची निव्वळ करमणूक !, चंद्रकांत पाटलांचा पलटवार 

मुंबई । राज्यात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावावरून सध्या बऱ्याच उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (२ नोव्हेंबर) केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हसन मुश्रीफ यांचा हा दावा हास्यास्पद आहे. यातून लोकांची निव्वळ करमणूक होते”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफ यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले ?

* कॉंग्रेसवाले स्टोऱ्या तयार करण्यात माहीर आहेत.

* कधी शरद पवार पत्र लिहितात, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणात टिका करतात तर कधी मंत्री आरोप करतात.

* हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हा निव्वळ राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

* राज्यपालांच्या पदाचा मान राखला गेला पाहिजे.

* मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

* मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने घटनातज्ञांना बोलावून चर्चा करायला हवी.

हसन मुश्रीफ यांनी काय दावा केला आहे ?

“कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी चंद्रकांत पाटील गेले होते. यावेळी सांत्वनापर चर्चा झाल्यानंतर विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार असल्याची बातमी आली. त्या बातमीवर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली असून ही यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलं आहे”, असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा – निलेश राणे

News Desk

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मालिकांच्या जावयाला NCB कडून अटक

News Desk

#COVID19 : राज्यातील प्राणी संग्रहालये व वन्यप्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घ्यावी !

News Desk