HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘राजगड’समोर फेरीवाले, मनसेचा पालिकेच्या निर्णयाविरोधात मोर्चा

मुंबई। मनसेने मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी करणार मोर्चा काढला होता. मात्र, आता महापालिकेने मनसेच्या कार्यालयाबाहेर फेरीवाल्यांना बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसेकडून आज (१३ फेब्रुवारी) पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मनसेचे राजगड कार्यालयाबाहेरील पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्वेअरपर्यंतच्या पदपथांवर तब्बल १०० फेरीवाले बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला मनसेने विरोध केला असून रहिवासी परिसरात फेरीवाले बसू देणार नाही, असा इशारा देखील महापालिकेला दिला आहे. यामुळे सध्या मुंबईत मनसे विरुद्ध पालिका असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला आहे.

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयाच्या आदेशानुसार पावले उचलली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, प्रथम केलेल्या फेरीवाला क्षेत्राला लोकांच्या झालेल्या विरोधानंतर सुधारीत यादी तयार करण्यात आली. या सुधारित यादीनुसार महापालिकेने विविध विभागातील फेरीवाला क्षेत्रातील पदपथावर एक बाय एकच्या आकाराच्या जागा रंगवण्यास सुरुवात केली आहे. यात दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये १४ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या १४ रस्त्यांवर १ हजार ४८५ फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.

मुंबईत ‘या’ ठिकाणी बसणार फेरीवाले

 • धारावी ६० फूट रोड – ८० फेरीवाले
 • माहिम एम.एम.सी रोड – ५० फेरीवाले
 • भागोजी किर रोड – ५० फेरीवाले
 • माहीम सुनावाला अग्यारी रोड – १०० फेरीवाले
 • शितलादेवी रोड – १५० फेरीवाले
 • पद्माबाई ठक्कर रोड – १०० फेरीवाले
 • एन.सी.केळकर रोड – १०० फेरीवाले
 • एल.जे.रोड – ३०० फेरीवाले
 • सेनापती बापट मार्ग – २०० फेरीवाले
 • व्ही.एस.मटकर मार्ग – ३० फेरीवाले
 • बाबुराव परुळेकर मार्ग – ५० फेरीवाले
 • भवानी शंकर रोड – ७५ फेरीवाले
 • गोखले रोड – १०० फेरीवाले
 • पंडित सातवडेकर मार्ग – १०० फेरीवाले

Related posts

अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल!

rasika shinde

#CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चे पालन केले नाही, दिसताक्षणी गोळी मारण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

अपर्णा गोतपागर

पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन ‘या’ भाजप नेत्याने ओळखले बांग्लादेशी

rasika shinde