HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

बीड | विधानसभा निवडणुकीतील परळी मतदार संघात राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा काल (१९ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस तथा मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बनावटी असून ती व्हिडीओ क्लिप एडिट करून व्हायरल केल्याचा आरोप धनंजय मुंडे करत आहेत.

“ही व्हिडिओ क्लीप माझी बदनामी करण्यासाठी वापरल्या जात असल्याचे खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोदात परळी शहर पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांची त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहून या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविरोधात केल्या आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे. यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी ‘धनंजय मुंडे मुर्दाबाद’ अशा घोषणा देत थेट परळी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करत अटकेची मागणी करीत घोषणाबाजी केली होती. जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर पंकजा मुंडे समर्थक पोलीस स्थानकातच ठाण मांडून बसले होते. अखेर परळी शहर पोलीस ठाण्यात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे ५०९, २९४ आणि ५०० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टमध्ये नमके काय लिहिले

शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे.

मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित.

मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचे वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही. काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध! – मुख्यमंत्री

Aprna

उत्पादन वाढीसाठी बांधावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करा! – विजय वडेट्टीवार

Aprna

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला सभात्याग

Aprna